शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट", 13 December

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट"

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

Highlights

Sat, 13 Dec, 2025 at 06:00 am

रत्नागिरी

Advertisement

Date & Location

Sat, 13 Dec, 2025 at 06:00 am - Sun, 14 Dec, 2025 at 02:00 pm (IST)

रत्नागिरी

Math, Maharashtra, India, Ratnagiri

Save location for easier access

Only get lost while having fun, not on the road!

About the event

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट"
मोहीम क्रमांक १६१
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट"
तालुका - लांजा, शाहूवाडी व संगमेश्वर
जिल्हा - रत्नागिरी, कोल्हापूर
श्रेणी - मध्यम
दिनांक – १३ आणि १४ डिसेंबर, २०२५

घाटवाटा भटकंती अंतर्गत यावेळेस शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित करत आहे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या दोन ऐतिहासिक तरीही दुर्लक्षित अशा घाटवाटांची मोहीम, माचाळ-विशाळगड-देवडे.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडं पुढे स्थिरावलेल्या विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याच्या रहाळात विसावलेली दोन गावे, माचाळ व देवडे. पैकी रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ गावातून एक घाटवाट चढून थेट विशाळगडापाशी पोहोचता येतं, तर विशाळगडावरून दुसऱ्या एका वाटेने उतराई करून पुन्हा रत्नागिरीमधीलच देवडे या दुसऱ्या गावात खाली कोकणात उतरता येतं. या दोन वाटांची भटकंती आपण या मोहिमेमध्ये करणार आहोत.
या दोन्ही वाटांची चढाई उतराई हा मोहिमेचा गाभा असला तरी त्यासोबतच रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील सह्याद्रीच्या परिसरात आपण निवडक स्थलदर्शन करणार आहोत. यात माचाळ गावातील डोंगरात असलेली प्रभू श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मुचकुंद ऋषीं यांची गुहा आहे, याच गुहेत कालयवन राक्षसाचा वध मुचकुंद ऋषीं यांनी केला होता. या गुहेतून कोकणाचे दिसणारे दृश्य नयनरम्य आहे. सोबतच ऐतिहासिक व रणस्थळ असलेला विशाळगड किल्ला भटकंती, तसेच मार्लेश्वर शिवमंदिर व संगमेश्वरातील शंभू छत्रपतींच्या निडर परिक्रमाची साक्ष देणारा सरदेसाई वाडा अशा वैविध्यपूर्ण ठिकाणांचा यात समावेश आहे.

रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या आगळ्यावेगळ्या भटकंतीसाठी तयार रहा.

विशेष सूचना - मोहीम प्रमुख किंवा मोहीम कार्यवाह यांच्याशी आधी बोलावे आणि नंतरच मोहिमेची फी भरावी.

कार्यक्रमाचा तपशील :-
शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ रोजी लालबाग, मुंबईहून रात्रौ ८. ०० वाजता खाजगी बसने माचाळ, रत्नागिरीकडे प्रयाण.
शनिवार १३ डिसेंबर २०२५ सकाळी अंदाजे ५ वाजेपर्यंत माचाळ गावात आगमन. फ्रेश होऊन सकाळी ६ वाजता मुचकुंद ऋषीं यांच्या गुहेकडे चढाईला सुरुवात. गुहेची आणि परिसराची माहिती घेऊन साधारण सकाळी ९.३० वाजता पुन्हा माचाळ गावात येऊन नाश्ता आटोपणे आणि तिथूनच दुपारच्या जेवणासाठी पॅक लंच घेऊन अंदाजे १० वाजता विशाळगडाकडे प्रस्थान. अंदाजे दोन तासाच्या पायपीटीनंतर विशाळगडावर दाखल. तेथील ठराविक स्थळदर्शन करुन साधारण १ वाजता सोबत आणलेला पॅक लंच करुन दुपारी दोन वाजता उतराईला सुरुवात. संध्याकाळी साधारण ५.३० वाजता खाली देवडे गावात आगमन आणि तिथेच रात्रीचा मुक्काम. रात्री सहभागी सदस्यांची ओळख आणि गप्पांची मैफिल.
रविवार १४ डिसेंबर २०२५ सकाळी ७ वाजता चहा-नाश्ता करून श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे रवाना. शिवशंकरांचे दर्शन घेऊन संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याला भेट. साधारण ११ वाजेपर्यंत ही भटकंती आटोपून वाटेत दुपारचे जेवण घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना.

ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये २,६५०/- (रुपये दोन हजार सहाशे पन्नास फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, दोन वेळ चहा-नाश्ता, तीन वेळचे जेवण, राहणे अंतर्भूत).

शनिवार १३ डिसेंबर चा सकाळचा नाश्ता संस्थेकडून दिला जाईल.

मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे.

आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये २,५५०/- (रुपये दोन हजार पाचशे पन्नास फक्त) असेल.

नाव नोंदणीची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०२५ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २ डिसेंबर २०२५ नंतर ट्रेक फी : रुपये २,७५०/- (रुपये दोन हजार सातशे पन्नास फक्त) असेल.

ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर नाश्ता, पाणी बाटली नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) मधमाशांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे वापरू नये.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे, टॉवेल.
४) पाण्याची २ लिटर बाटली.
५) स्वतः पुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील.

नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता गुरुनाथ मयेकर / ९८६९०८४९१२ किंवा गौतम कास्कर / ९३२३७१७८८३ या क्रमांकावर WhatsApp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २९ नोव्हेंबर २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २९ नोव्हेंबर २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) संस्थेच्या आजीव सदस्यांना आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे अन्यथा ट्रेक फी मधील सवलत दिली जाणार नाही.

नाव नोंदणी झाल्यावर "माचाळ-विशाळगड-देवडे घाटवाट" या WhatsApp गृपमध्ये समाविष्ट केले जाईल. गृपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, सूचना दिल्या जातील आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.

आपले नम्र :-
मोहीम प्रमुख - गुरुनाथ मयेकर / ९८६९०८४९१२
===================================
मोहीम कार्यवाह - गौतम कास्कर/ ९३२३७१७८८३

शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई - / ९३२०७ ५५५३९
पुणे - स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वसई/पालघर - हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७
डोंबिवली - श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा - श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
खारघर - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई - अजित नर/ ९८१९५ ६६१२०
वांद्रे - नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५

Bank Details :-
Bank Name - Bank of Maharashtra
Branch - Prabhadevi
Account No - 60134804616
IFSC Code - MAHB0000318
Branch Code - 000318
Account Name - SHIVASHOURYA TREKKERS

ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. त्यानंतरच नावनोंदणी होईल व बसमधील सीट आरक्षित केली जाईल. त्यानुसारच बसमधील सीट नंबर दिले जातील.

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/...

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers


You may also like the following events from Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स:

interested
Stay in the loop for updates and never miss a thing. Are you interested?
Yes
No

Ticket Info

To stay informed about ticket information or to know if tickets are not required, click the 'Notify me' button below.

Advertisement

Nearby Hotels

रत्नागिरी, Math, Maharashtra, India, Ratnagiri
Get updates and reminders
Ask AI if this event suits you
Advertisement
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट", 13 December
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "माचाळ - विशाळगड - देवडे घाटवाट"
Sat, 13 Dec, 2025 at 06:00 am