शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोफत ट्रेक "बालमोहिम २०२५ - किल्ले सिंहगड"
वयोमर्यादा वर्ष : ५ ते १४ (इ. १ली ते १०वी)
दिनांक : १ नोव्हेंबर २०२५
सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमेच्या दरम्यान अनेक उपक्रम राबविले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे पुणे जिल्ह्यातील "किल्ले सिंहगड" शनिवार दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १० वी) या वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत ट्रेक आयोजित केला आहे. मोहिमेत लहान मुलांची सदस्य संख्या फक्त ४५ इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा साधारण तपशील :-
शनिवार दि. १ नोव्हेंबर २०२५ सकाळी ५.४५ वाजता भारतमाता चित्रपटगृह, लालबाग (पूर्व) येथून बसने सिंहगड किल्ल्याकडे रवाना.
रात्रौ अंदाजे १० वाजता भारतमाता चित्रपटगृहाबाहेर मोहिमेची सांगता होईल.
सकाळचा नाश्ता, १ लिटर पाण्याची बाटली, टोपी, सुका खाऊ (तेलकट नसलेला), बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे, या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेता येईल अश्या बॅगेत भरून आणाव्या. एक जोडी जास्तीचे कपडे एका प्लास्टिक बॅग मध्ये देणे जे बस मधे ठेवायाचे आहे. दुपारचे जेवण आणि सायंकाळी सर्वांना चहा-नाश्ता दिला जाईल.
पालकांचा WhatsApp क्रमांक द्यावा.
विशेष सूचना :-
जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेता येईल.
आपले नम्र :-
अर्णव चव्हाण - ७७९८३ ९६६६४ (मोहीम प्रमुख)
तेजश्री खरपुडे - ९८९२१ ७०६०३ (मोहीम कार्यवाह)
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स – मुंबई /९३२०७ ५५५३९
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वांद्रे - नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५
वसई – हार्दिक म्हात्रे /९०४९० १३६७७
खारघर - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई - अजित नर / ९८१९५ ६६१२०
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
https://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers