*🍀🌸☘️Il श्रीराम समर्थ ll☘️🌸🍀*
*ll अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय ll*
*🌸नामसोहळा येहळेगाव - उमरखेड 2025* 🌸
आज पासून आपण नाम सोहळ्यासाठी नोंदणी सुरू करत आहोत. आधी नमूद केल्याप्रमाणे हा सोहळा 25, 26, 27 जुलै रोजी येहळेगाव येथे होणार असून तिन्ही दिवसांची रूपरेषा खाली दिलेली आहे.
आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी नाव नोंदणी करताना कृपया खालील मुद्दे लक्षात घ्यावेत :
1. या मेसेज सोबत श्री उमेश जलतारे यांचा QR Code दिलेला आहे. आपल्याला सोहळ्यासाठी नोंदणी करताना या QR Code वर *प्रत्येकी 2100* रुपये याप्रमाणे पैसे पाठवायचे आहेत. QR code वर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे जात नसतील तर आपण उमेश जल तारे यांच्या मोबाईल नंबर वर डायरेक्ट पैसे पाठवू शकता.
1. पैसे पाठवल्यानंतर आपण खालीलपैकी एका क्रमांकावर पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट व पुढील डिटेल्स पाठवावेत.
A. पैसे कुणाच्या अकाऊंट वरून भरले त्यांचे नाव
B. पैसे कुणासाठी भरले त्यांचे नाव
C. प्रवासाला येणाऱ्या साधकांचा मोबाईल नंबर
D. पैसे भरल्याची तारीख
👉🏻 *स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी नंबर :*
*A. उमेश जलतारे - 9373100155*
*B. विनायक हिरे - 8866078047*
2. स्क्रीन शॉट पाठवल्यानंतर आपल्याला गुगल फॉर्मची एक लिंक पाठवण्यात येईल. हा फॉर्म आपल्याला इंग्लिश मध्ये भरायचा आहे. यामध्ये आपण आपले नाव आपला पत्ता व आपल्याला जवळ असलेला बस स्टॉप निवडायचा आहे. हा बस स्टॉप निवडताना कृपया काळजीपूर्वक निवडावा जेणेकरून तुम्हाला तिथे सोयीस्कर पोचता येईल. गुगल फॉर्म भरताना काही अडचण आल्यास खालील साधकांशी संपर्क करावा.
*A. सुहास देशपांडे -* *9049627629*
*B. तुषार लांबे - 9657702142*
3. या प्रवासासाठी आपण एक बस पुण्यातून व एक बस पिंपरी चिंचवड मधून काढणार आहोत. यामध्ये काही मोजके ठिकाणी आपण बस स्टॉप दिलेले असून यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सोयीचे होईल असे बघण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या घराजवळ आपण बस स्टॉप देऊ शकत नाही त्यामुळे फॉर्म भरताना कोणीही कृपया आमच्या घरा जवळचा बस स्टॉप द्यावा असा आग्रह धरू नये, *ही नम्र विनंती.*
👉🏻 *पुणे बस मार्ग - वनाज - चांदणी चौक - सनसिटी हायवे स्टॉप - नवले ब्रीज - कात्रज झू - वाळवेकर नगर- नोबल हॉस्पिटल चौक - खराडी बायपास - वाघोली*
👉🏻 *पीसीएमसी बस मार्ग - आकुर्डी खंडोबा मंदिर - चापेकर चौक - डांगे चौक - काळेवाडी फाटा - जगताप डेअरी - ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर*
4. संपूर्ण प्रवासासाठी आपण सुस्थितीत असलेल्या ट्रॅव्हल्स बस बुक केल्या आहेत. आपण श्री महाराजांच्या कार्यासाठी जात असून सर्वांना योग्य आणि शक्य त्या सोयी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु कृपया बस मध्ये समोरील सीट बुकिंग, मुक्कामाच्या ठिकाणी बेड अशा इतर गोष्टींची मागणी असू नये. ज्यांना खरेच गरज आहे त्यांना आवश्यक त्या सुविधा नक्की उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
5. या प्रवासात आपण श्रीक्षेत्र देवगड, वाशिम बालाजी मंदिर, येहळेगाव, उमरखेड या क्षेत्रांना भेटी देणार आहोत.
6. ज्यांना संकल्प घ्यायची ईच्छा असल्यास कळवावे ही विनंती त्यांचा संकल्प शनिवारी सकाळी होईल (1.25 कोटी, 3.5 कोटी, 13 कोटी )
*👇🏻रुपरेषा खालील प्रमाणे*👇🏻
🌸 *25 जुलै शुक्रवार*🌸
👉 पहाटे 6 वाजता गाडीपूजन व प्रस्थान
👉 जाताना देवगड, वाशिम बालाजी, दर्शन
👉रात्रौ 10.30 (शेजारती )
🌸 *26 जुलै शनिवार*🌸
👉 पहाटे 5.30 ते 10.30
(एक आसनी 5 तास अखंड नामस्मरण प्रत्येकी अर्धा तास - ज्यांना करायचे त्यांनी नावे कळवावी )
👉 पहाटे 5.30 ते 8
( काकडा आरती,गायन सेवा फेर, पावली भजन )
👉सकाळी 7.30 ते 8.30
अभिषेक संकल्प / नामजप संकल्प (इच्छुक साधक )
👉सकाळी 8.30 ते 9
(चहा / नाष्टा )
👉 गोदान संकल्प 9 ते 9.30
👉गोदान पूजन 9.30 ते 10.30
👉(सामूहिक नामजप )
सकाळी 10. 30 ते 12.00
👉दुपारी 12 ते 2
(नैवेद्य /आरती /महाप्रसाद )
👉दुपारी 2.30 ते 6
(भजन सेवा )
👉सायं 6 ते 6.30
(चहा पाणी )
👉सायं 7 ते 8.30
(उपासना /गायन सेवा )
👉रात्रौ 8.30 ते 10
(महाप्रसाद )
👉रात्रौ 10 (शेजारती )
👉रात्रौ 10.30
(सत्संग चर्चा इच्छुक साधक )
🌸 *27 जुलै रविवार*🌸
👉पहाटे 5.30 ते 6.30
(काकडा आरती )
👉सकाळी 6.30ते 7
(धन्यवाद /आभार /सांगता )
👉सकाळी 7 ते 7.30
(चहा / नाष्टा )
👉सकाळी 8 ला उमरखेड प्रस्थान
👉सकाळी 10.30 ते 2.00
(दर्शन -भजन सेवा-नैवद्य - महाप्रसाद )
👉दुपारी 3 पुणे करिता प्रस्थान
👉 रात्री 3 - 4 पर्यंत पुण्यात अपेक्षित.
(*यात येहळेगाव येतांना देवगड तसेच वाशीम दर्शन 1 माळ नामजप होईल* )
*🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏*