दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩, 16 August

दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩

Shiledar Adventure India

Highlights

Sat, 16 Aug, 2025 at 07:00 am

किल्ले रायगड

Advertisement

Date & Location

Sat, 16 Aug, 2025 at 07:00 am - Sun, 17 Aug, 2025 at 06:00 pm (IST)

किल्ले रायगड

Hirkaniwadi School, Mahad 402305, India, Mahad

Save location for easier access

Only get lost while having fun, not on the road!

About the event

दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩
दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम

(राहाळ परिरातुन) 🚩

रायगडचा मुसळधार पाऊस अनुभवत रायगडच्या रहाळ परिसरातील ऐतिहासिक ठेवा पाहत दुर्गपढंरी रायगडला परिक्रमा करण्यास अवघे अवघे या ...!🚩

रायगड पहायला तर सर्वच जातात, रायगड प्रदक्षिणा तळवटितुन सर्वच करतात पण रायगडच्या घेरा परिसरातुन प्रदक्षिणा करत परिसरात असलेल्या गावामधील इतिहास जानुन घेण्यासाठी शिलेदार परिवार रायगड घेरा परिसरातुन पावसाळ्यात प्रदक्षिणा मोहिम आयोजित करत असतो.

मोहिम दिनाक - 16/17 ऑगष्ट 2025
(दोन दिवसिय मोहिम)

मोहिमेचा मार्ग -
रायगड पायथा - हिरकणीवाडी - काळकाई खिडं - वाघोली - मागंरुन - वाळनकोडं - वाघेरी - पाणे - वारगीं (मुक्काम) - टकमकवाडी - रायगडवाडी - नाणे दरवाजा - रायगड

मोहिम शुल्क -

2500/- मुंबई ते मुंबई

2500/- पुणे ते पुणे

1500/- Base to Base

(प्रवासखर्च, दोन दिवस चहा नाष्टा जेवन, प्रमाणपत्र, फस्ट एड, मुक्काम खर्च ई.)

(Group Discount दिला जाईल.)

तर मित्रहो...

महाराजांनी मुळात रायरीला रायगड - स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडला असेल हे जर खरंच जाणून घ्यावयाचे असेल तर रायगड प्रदक्षिणा करायलाच हवी, रायगडाचे चोहो बाजुने भव्य रुप अनुभवायला हव. रायगडसोबतच रायगड रहाळ परिसरात असलेला ऐतिहासिक ठेवा अभ्यासायला हवा.

काय पहाल -

1. आपल्या तान्हूल्या बाळासाठी रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी कड्यावरुन ऊतरुन हिरकणी वाडीत गेलेल्या हिरकणीची वाडी

2. ज्या पोटल्याच्या डोगंरावरुन ईग्रजानी रायगडावर मारा केला तो पोटल्याचा डोगंर

3. रायगडाच्या मुख्य प्रदक्षिणा मार्गातिल काळकाई खिडं व तेथील तटसरनोबत जावजी लाड स्मारक (या खिडींतुन आपल्याला वाघ दरवाजाचे दर्शन होईल)

4. वाघोली गाव - कदाचीत याच नावावरुन वाघ दरवाजा हे नाव दरवाजास पडले असेल. वाघोली गावातील ऐतिहासिक तलवार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तोफ, विरगळी

5. माघंरुन गाव येथील अनामीक विराच्यां समाध्या

6. वाळनकोडं - रायगड परिसरातील सर्वाचे श्रद्धास्थान असलेले देवीचे ठाणे. ईथला काळ नदिवरिल पुल पाहण्यासारखा आहे.

7. पाणे गाव येथोल सहा फुटं ऊचं चतुर्भूज अनामिक योध्यांची विरगळ

8. पाणे व सिंगापूर धबधबा - वाटेवरच पाणे गाव धबधबा आहे व सिंगापूर धबधबा दुरवर दिसतो.

9. घाटावरुन कोकणात ऊतरणा-या एतिहासिक नाळवाटा/घाटवाटा

10. रौद्रभिषन लिंगाण्याच पावसाळ्यातील मनमोहक रुप

11. वारंगी गाव - वारगी हे एतिहासिक गाव आहे. ईथल्या शिवमंदिरात महाराजाच्या पुजनातील शिवलिंग आहे अशी अख्याईखा आहे. रायगडाला जेव्हा जुल्फिरखानाचा वेढा पडला तेव्हा आपल्या मावळ्यानी भवानी कड्यावरुन जगदिश्वर मंदिरातील शिवलिंग खाली आणुन वारंगी गावात वसवले. वारंगी गावातुन गडावरील शिवसमाधी दिसते. गावातील विरगळी पाहणार आहोत.

12. रायगडच्या टकमक टोकाखाली असलेली सुदंर टकमकवाडी व रायगडवाडीतील तोफा विरगळी समाध्या

13. सर्वात महत्वाचे - रायगडाच्या रहाळ परिसरातुन प्रदक्षिणा करत असताना आपण रायगडाचे सर्व बाजुने दर्शन घेणार आहोत. रायगड चोहोबाजुने आपली वेगवेगळी मनमोहक रुपे दाखवत असतो. असा रायगड पाहताना मन आनदून जाते.


चला तर मित्रहो,

रायगडच्या रहाळ परिसरातील ईतिहास जानुन घेत चोहो बाजुनी रायगड पहायला अवघे अवघे या.

पुस्तक वाचुन अथवा ईटंरनेटवर पाहून प्रदक्षिणेचा अनुभव घेता येत नाही. या प्रदक्षिणेत आपण इतिहास आणि भूगोल अनुभवतो, वेळेचे भान ठेवत , शरीराचा कस लावत, पाण्याचे नियोजन करत एकमेकांना सांभाळत संपूर्ण रायगडाला आणि या रायगडावर चीर निद्रेत असणाऱ्या शिवाच्या अंशाला प्रदक्षिणा घालून नतमस्तक होत असतो.

प्रत्येकाने एकदा तरी नक्की करावी अशी हि रायगड प्रदक्षिणा रहाळ परिसरातुन.....!!

मोहिमेस ईच्छुकानी संपर्क करावा.

9022556690 / 9004715001 /9004615001

अधिक माहिती मोहिम वाॅट्स अप समुहात दिली जाईत व मोहिमेची तयारी करुन घेतली जाईल.

https://chat.whatsapp.com/CNhLsc8Qlgl8l8cMEGzWbx?mode=ac_t


(जे सदस्य मोहिमेला येणार आहेत फक्त त्यानीच समुहात सहभागी व्हा विनतीं)

धन्यवाद

आयोजक

#शिलेदार
#ShiledarAdventureIndia
Moving Towards The Goals...!


You may also like the following events from Shiledar Adventure India:

interested
Stay in the loop for updates and never miss a thing. Are you interested?
Yes
No

Ticket Info

To stay informed about ticket information or to know if tickets are not required, click the 'Notify me' button below.

Advertisement

Nearby Hotels

किल्ले रायगड, Hirkaniwadi School, Mahad 402305, India, Mahad
Get updates and reminders

Host Details

Shiledar Adventure India

Shiledar Adventure India

2 Followers

Are you the host? Claim Event

Advertisement
दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩, 16 August
दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩
Sat, 16 Aug, 2025 at 07:00 am