*ACS CYCLOTHON 2025*
ACS हॉस्पिटल, हे भैया चौक या मध्यवर्ती ठिकाणावर अद्यावत हृदयविकार उपचार केंद्र असून चार निष्णात हृदयतज्ञ डॉक्टर मित्रांनी, आधुनिक तंत्रज्ञान व करुणामय, रुग्ण_ केंद्रित सेवांचा संगम साधत हॉस्पिटल सुरू केले आहे.
डॉक्टर सिद्धांत गांधी,डॉक्टर राहुल कारीमुंगी, डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर दीपक गायकवाड या चार मित्रांनी कार्डिओलॉजी क्षेत्रातले पहिले उच्च दर्जाचे, नैतिक व तंत्रज्ञान आधारित हृदय विकास सेवा पुरवणारे केंद्र सोलापुरात चालू केले.
सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच *AI* चा वापर करून तीन जटील हृदय शस्त्रक्रिया ACS टीमने यशस्वीरित्या पार पाडल्या, याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे कौतुक होत आहे .
ACS टीमने *तंदुरुस्ती* हाच दृष्टिकोन समोर ठेवून जागतिक हृदय दिनाचे ( 29 सप्टेंबर 2025) औचित्य साधून *ACS CYCLTHON 2025* आयोजित केले आहे, जेणेकरून सायकलिंग द्वारे आपले शरीर स्वस्थ, तंदुरुस्त, राहील याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष वेधले आहे.
ACS व रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य असा आरोग्य संवर्धन, प्रदूषण विरहित सायकलिंग रॅली आयोजित केली आहे.