कन्नड शहर पोलीस ठाणे पोलीसांनी धडक कारवाई
चैन स्नँचींग मधील आरोपीतांना केली 24 तासाच्या आत अटक
पोलीस प्रशासनाचे शहरात नागरिकांकडून होत आहे कौतूक
-कन्नड प्रतिनिधी :किशोर राजगुरू
पोलिस ठाणे कन्नड शहर येथे दिनांक 09/09/2025 धनंजय रमेशराव भोसले वय 30 वर्ष व्यवसाय-शेती रा.सरस्वती कॉलनी हुकुमचंद नगर कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली की,दिनांक 08/09/2025 रोजी सायंकाळी 06.20 वाजेचे सुमारास खांडसरी परिसरातील राधा-कृष्ण कपडयाचे दुकानात बसुन घरी जाणेसाठी मी माझेकडील मो.सा. क्रं. MH-20-GS-7827 हिवर बसुन निघालो. रस्त्यात माझे घराचे पाठीमागेच असलेल्या नदीलगत रोडवर मी लघवीसाठी माझी मोटार सायकल उभी केली व लघवी करुन परत येवुन मो.सा.चालु करण्यासाठी बसत असतांना अचानक पाठीमागुन अनोळखी एक इसमाने गळ्यातील 02,70,174/- रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन झपटमारी करुन हिसकावुन व तोडुन चोरी करुन त्याचे इतर दोन आरोपी साथीदार यांच्या सोबत मोटार सायकलवर बसुन पळुन गेले आहे आहे, अशी फिर्याद दिल्यावरुन पोलिस ठाणे कन्नड शहर येथे गुरनं.252/2025 कलम 304(2),3(5) बी.एन.एस.2023 प्रमाणे दिनांक 09/09/2025 रोजी तीन अनोळखी आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा तपास मा. पोनि. सानप यांचे आदेशाने सपोनि कुणाल सुर्यवंशी व पोलिस अंमलदार विजय चौधरी हे करीत होते.
नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी गुन्हयाचे तपासा दरम्यान घटनेच्या ठिकाणाचे आजूबाजुच्या परीसरातील सात ते आठ ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही.फुटेज हस्तगत करुन व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे त्यातील आरोपी निष्पन्न करून दोन आरोपीतांना दिनांक 10/09/2025 रोजी अटक करण्यात आलेले असुन आरोपीतांकडे गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याची चैन बाबत तपास करून ती हस्तगत करुन आरोपीतांना मा.न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/ आर.बी.सानप यांच्या आदेशाने सपोनि/ कुणाल सुर्यवंशी, पोशि विजय चौधरी नेमणुक कन्नड शहर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे