Ankush Waware
Advertisement
उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ऑटो मेडिकेअर साऊथ कोरिया कंपनी बारामती यांच्यातर्फे धान्य व खाऊ वाटपाची मदत..... बातमी दिनांक-11/2/2025 दिनांक -10/02/2025 रोजी ऑटो मेडिकेअर साउथ कोरिया कंपनी बारामतीचे श्री. रमेश गणपत जोशी साहेब व त्यांच्या कंपनीचा सर्व स्टाफ हे या कंपनीच्या माध्यमातून बारामती परिसरातील खेड्यातील त्रासलेल्या गरजू लोकांना निरोगी आयुष्य देण्याचं काम अविरतपणे करणारी ही संस्था समाजातील लोकांची समाजसेवा व आरोग्याची उत्तम सेवा विनाशुल्क/ मोफत देत आहे. आज या ऑटो मेडिकेअर सेंटरचा वर्धापन दिन व श्री. रमेश जोशी सरांचा वाढदिवस सोहळा उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या शाळेला वस्तू स्वरूपात साखर, गहू, तेल डब्बा, तांदूळ, ज्वारी, हरभरा डाळ, मूग डाळ, रांगोळी, छोट्या वह्या इत्यादी स्वरूपाची मदत केली. त्यावेळी श्री. रमेश जोशी सरांसोबत त्यांच्या कंपनीचे सौ. अश्विनी जाधव मॅडम, सो. मोघेळकर सीमा- माजी सरपंच जंक्शन, सौ. पद्मावती सोनवणे, श्री. लालासाहेब सूर्यवंशी, श्री. नलावडे काका, श्री. पोपटराव यादव- सुभेदार मिलिटरी, श्री. विजय गावडे आणि हॅप्पी मेडिकेअर सेंटरचा सेवाभावी सर्व स्टाफ उपस्थित होता. आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या उत्कट भावनेतून ही संस्था काम करत आहे ही खरोखर कौतुकाची बाब आहे. यावेळी आपल्या संस्थेचे अध्यक्ष , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. त्याबद्दल आपल्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन ऑटो मेडिकेअर कंपनीचे आभार मानण्यात आले.
Advertisement